मुंबई
100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक झालीय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जवळपास 13 तासांपासून ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज ईडीसमोर हजर राहिले होते.
ईडीकडून त्यांची जवळपास 13 तास मॅरेथॉन चौकशी सुरू होती. त्यांच्यावर जे आरोप होते, त्या अनुषंगानं चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्यात.
1 नोव्हेंबरला सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर जी त्यांची चौकशी सुरू झाली, ती आतापर्यंत सुरू होती. त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीय.
मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2 नोव्हेंबरला सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.