पुणे
मावळ तालुक्यातील साते गावात भंगार दुकानाच्या ना हरकत परवान्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ पकडले पण सरपंच मात्र फरार झाला आहे.
ऋषिनाथ आगळमे असे अटक केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असुन या दोघांविरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार भंगार दुकानदार असल्याने त्याने साते गावात दुकान चालु केले होते.परंतु सरपंचाने तक्रारदाराला बोलावुन तु दुकान चालु करण्यासाठी परवानगी घेतली नाही.तेव्हा तक्रारदाराने ग्रामपंचायतीकडे ना हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता.
सरपंचाने ना हरकत परवान्यासाठी दीड लाख रुपयाची मागणी केली.तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.व सापळा रचला.
ऋषीनाथ आगळमे हा ग्रामपंचायत सदस्य लाचेची रक्कम घेण्यासाठी आला तेव्हा तक्रारदाराकडुन एक लाख रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडले.त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे.याचा कानोसा लागताच सरपंच फरार झाला आहे.वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.