पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहसचिव पदी मंगेश गायकवाड

पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहसचिव पदी मंगेश गायकवाड

आंबळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुरंदर

पुरंदर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या सहसचिव पदी आंबळे गावचे रहिवाशी मंगेश गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या हस्ते देण्यात आले.

आज झालेल्या कार्यकारीणीच्या सभेत विविध निवडी करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने पुरंदर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश कामठे यांची तर उपाध्यक्ष पदी प्रविण नवले व समन्वयक पदी किशोर कुदळे यांची निवड करण्यात आली.

मंगेश गायकवाड यांनी आंबळे गावचे सरपंच पद भुषविलेले असुन पुरंदर तालुका वितरण व्यवस्था व दक्षता समितीचेही सदस्यपद भुषवत आहेत. दै. नवराष्ट्र चे प्रतिनिधी व संजीवनी न्युजचे कार्यकारी संपादक म्हणुन ते कार्यरत आहेत.

या सभेस निरा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश काकडे,पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष नाना भोंगळे,राहुल शिंदे,बी.एम काळे,राजेंद्र बर्गे तसेच जिल्हा प्रसिद्धि प्रमुख भरत निगडे,सचिव अमोल बनकर,चंद्रकांत चौंडकर,निखिल जगताप,हनुमंत वाबळे,सुनिता कसबे,श्रद्धा जोशी,योगेश खुटवड,संतोष जंगम आदी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *