माणुसकीला सलाम !!!!             सापडलेली पर्स एक लाख अठरा हजार रुपयांसहित केली परत

माणुसकीला सलाम !!!! सापडलेली पर्स एक लाख अठरा हजार रुपयांसहित केली परत

पुरंदर

संध्या विजय वाघमारे अंगणवाडी सेविका राहणार हडपसर पुणे या काल दिनांक 26. 10. 2021 रोजी सासवड येथे कामानिमित्त आलेल्या होत्या. त्यांनी एका बचत गटाकडून मुलीच्या शिक्षणासंबंधी फी भरण्यासाठी 110000 रुपये घेतलेले होते. ते पैसे त्यांनी काखेत अडकवण्याचा पर्समध्ये ठेवून त्या सासवड बस स्टँड समोरील पीएमटी स्टॉप वर थांबल्या व पर्स पीएमटी स्टॉप च्या बाकड्यावर ठेवून त्या फोनवर बोलत होत्या.

तेवढ्यात बस आली त्यांनी ताबडतोब बस पकडली व हडपसर कडे निघून गेल्या. पर्स पीएमटी स्टॉप वरील बाकड्यावरच विसरून गेली .हडपसर मध्ये गेल्यावर पर्स विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या ताबडतोब परत सासवड येथे आल्या. त्यावेळी पर्स त्याठिकाणी दिसून आली नाही त्याबाबत त्यांनी पोलिस स्टेशनला माहिती देऊन पर्स विसरल्याचे सांगितले.

पोलीस त्या ठिकाणी जाऊन आजूबाजूला चौकशी केली परंतु पर्स मिळून आली नाही. आज सौ सुनीता बाळू डोंगरे राहणार हडपसर यांनी बेवारस सापडलेली पर्स पोलीस स्टेशनला आणून जमा केली. पर्स ची पाहणी केली असता त्यामध्ये असलेले सर्व साहित्य जसेच्या तसे होते त्यामध्ये एक लाख 18 हजार रुपये कॅश ठेवलेली होती.

सर्व पैसे व पर्स मधील सामान सौ संध्या वाघमारे यांना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे समक्ष सुपूर्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक यांनी त्याबाबत सौ सुनिता डोंगरे यांचे अभिनंदन केले. पर्स हरवल्या पासून ते मिळेपर्यंत सर्व पाठपुरावा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुरज नागरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *