दौंड
ग्रामपंचायत मिरवडी अंतर्गत आज सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक ,कर्मचारी , पदाधिकारी व युवक मित्र व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्रमदान करून आज एका दिवसांत ५०० सीताफळ झाडांची लागवड करण्यात आली.
या लागवडीचा मुख्य उद्देश या झाडांना पुढिल वर्षी फळे लागून ती पक्ष्यांची अन्नधान्य स्वरूपात गरज भागवतील त्यांच्या मार्फत त्या बिया संपूर्ण परिसरात पसरतील व भविष्यात आपोआपच वृक्ष वाढीस मदत होईल.
गावातील एकूण 423 कुटुंबांना सरासरी 1 झाडापेक्षा अधिक झाडांचे फळ चाखण्यास मिळेल व त्यातूनही फळे शिल्लक राहिली तर गावाला एकूणच आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळेल या विचाराने आत्ता पर्यंत 6 महिन्यात गाव व परिसरात लोकसहभागातून चिंच,आवळा,जांभूळ,आंबा,सीताफळ अशे एकूण 1900 फळे व इतर झाडांची लागवड करून ते आज चांगल्या स्थितीत आहे.