पुरंदर
पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथे अजित युवा विकास प्रतिष्ठान व युवराज जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ५६० ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच ४५० ग्रामस्थांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून १२ ग्रामस्थांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम पुरंदर तालुक्याचे माजी आमदार श्री अशोकभाऊ टेकवडे व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री माणिकराव झेंडे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
त्यावेळी प्रमुख उपस्थित पीडीसी बँकेचे माजी चेअरमन ,संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडेसर, निरा कोळविहरे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष बापुसो भोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्री राजेशजी चव्हाण, मा जि-.प सदस्य श्री विराज भैया काकडे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श्री अजिंक्यभैय्या टेकवडे, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वीय सहाय्यक श्री मयुरदादा जगताप, दिवे गराडे गटाचे अध्यक्ष श्री योगेशनाना फडतरे, तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष संदेशजी पवार, तालुका कामगार सेलचे अध्यक्ष श्री विक्रमजी फाळके, कोळविहरे गणाचे युवक अध्यक्ष श्री अमोलजी कदम, भारतीय हॉस्पिटलचे डॉक्टर श्री संतोष रणवरे ,महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघाचे संचालक श्री सुरेशतात्या सस्ते , खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री संग्राम सस्ते, साकुर्डे गावचे मा. उपसरपंच सदस्य श्री सचिन थोपटे, साकुर्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रा.सदस्य श्री अजित जाधव ,सदस्य श्रीकांत सस्ते, सदस्या लिलाबाई गायकवाड ,निरा- कोळविहिरे गणाच्या अध्यक्षा वृषाली काटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चव्हाण साकुर्डे विद्यार्थी अध्यक्ष श्री सुदर्शन जाधव ,ओबीसी सेलचे मा.अध्यक्ष श्री राहुल भोंगळे, श्री काका जगताप, मधुकर जगताप ,श्री बाळासो जगताप, श्री निकेश सस्ते श्री अनिल चव्हाण श्री संदीप लोंढे ,श्री गणेश चव्हाण ,श्री अशोक धुमाळ श्री बंटी गायकवाड, किरण थोपटे व युवक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तानाजी झेंडे सर यांनी केले प्रास्ताविक श्री संग्राम सस्ते यांनी केले.
यावेळी मनोगत तालुक्याचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे श्री माणिकराव झेंडे पाटील ,बापुसो भोर, राजेशजी चव्हाण ,अजिंक्य भैय्या टेकवडे, आदींनी केले व आभार श्री युवराज जगताप यांनी मानले.
या शिबिराचे आयोजन अजित युवा विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या टेकवडे व युवराज जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.