पुरंदर
पुरंदर व बारामतीचे मोठे कार्यक्षेत्र असणार्या सोमेश्वर कारखान्याची निवडणुक काही दिवसावरच आलेली आहे.
या निमित्ताने कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितित नुकताच आंबळे याठिकाणी सभासद गाव भेट दौरा झाला.
सर्व उस उत्पादक शेतकर्यांना केंद्रबिंदु माणुन काम करणारा सोमेश्वर कारखाना असुन सभासदांच्या हिताची जपणुक ना.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे व येणार्या काळात पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही पुर्ण क्षमतेने चालवण्याचा कारखान्याचा मानस आहे. पुरुषोत्तम जगताप,चेअरमन,सोमेश्वर कारखाना
या वेळी जि.प.चे मा.अध्यक्ष विजय कोलते,जि.प.सदस्य.दत्तात्रय झुरंगे,मा.सदस्य सुदामआप्पा इंगळे,जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर,संचालक लालासाहेब नलावडे,शांताराम कापरे,निरा बाजार समितीचे उपसभापती नंदुकाका जगताप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडेपाटील,महिला अध्यक्षा गोरीताई कुंजीर,राजेंद्र धुमाळ,सोसायटीचे चेअरमन संजय जगताप,उपसरपंच सचिन दरेकर,अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष नाजीम शेख,मा.सरपंच शशिकांत दरेकर,गुलाब जगताप,संजय सणस,भानुदास सणस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष संदेश पवार तसेच सर्व सभासद उपस्थित होते.