पुणे
कात्रज चौकाजवळ “कात्रजचा खून झाला” असे विचित् होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या विचित्र होर्डिंगवरुन मंगळवारी दिवसभर शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होती, तसेच त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही पसरले होते.
याप्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर (वय 52, रा.कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन अनोळखी व्यक्तिविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर मंगळवारी एका एका होर्डिंगवर रक्ताने माखलेला चाकूचे चित्र असलेला आणि त्यावर “कात्रजचा खुन झाला” असा विचित्र मजकुर लिहिला होता.
त्यामुळे दिवसभर शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होती, तसेच त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही पसरले होते. भारती विद्यापीठ पोलिसांकडुनही या प्रकरणचा तपास सुरु होता. अखेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्यावतीने अनोळखी व्यक्तिविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.