पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वीर-भिवडी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या युवक अध्यक्षपदी पिंपळे गावचे सुहास पोमन यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
पक्षाचा व संघटनेचा विस्तार करुण अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी एकनिष्ठेने पार पाडुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे सुहास पोमन यांनी सांगीतले.
सुहास पोमन यांची वीर-भिवडी गट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड झाल्याने पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे.