पुरंदर
दि. १२/०९/२०२१ रोजी पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी मधील तरुणांनी छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान अंतर्गत ग्रामस्थांना ई पिक पाहणी करीता मोबाईल अँप मध्ये माहिती भरताना येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी काळदरी गावाचे तलाठी सोनवणे यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन शासकीय सुट्टीदिवशी थोपटेवाडी मध्ये उपस्थित राहून ग्रामस्थांना ई पिक पाहणी बाबत मार्गदर्शन करून, प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन नोंद करून दाखविली.
यावेळी शेतकऱ्यांना या उपक्रमाची तलाठी सोनवणे, वाल्हेकर, सुरेश मोरे यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. ॲड्रॉइड मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप प्लेस्टोर वरून घ्यावे व आपली पुर्ण माहिती भरल्यानंतर चार अंकी साकेतांक क्रमांक येईल व ते कायम राहिल व एका मोबाईल क्रमांक वरुन २० खातेदारांची नोंदणी आपण करु शकतो यामुळे आपले फायदे काय हे सांगण्यात आले. पिक पाहणी न केल्याने होणारे तोटे याची माहिती दिली. या योजनेमुळे शासनाला खरी माहिती जाते. व शासनाला नियोजन करणे सोपे होते अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गावातील उपस्थित शेतकरी वर्गाने व तरुण युवकांनी चांगल्या प्रकारे माहिती घेतली व आपले समाधान व्यक्त केले.
ज्या ग्रामस्थांना पिक पाहणी करताना अडचण येत आहे त्यांच्याकरिता प्रतिष्ठान मार्फत अतुल थोपटे, . प्रसाद थोपटे, अभिजीत थोपटे, हरिश्चंद्र थोपटे, सुरेश मोरे प्रत्यक्ष नोंदी करून देतील. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ई पिक पेरा नोंद करून घ्यावे असे आवाहन काळदरी ग्रामपंचायतच्या सदस्या सौ. राणीताई राहुल थोपटे यांनी केले. याप्रमाणेच वेळोवेळी अशा समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांकरिता होत राहील असे मत ॲड. राहुल थोपटे यांनी व्यक्त केले.शासकीय सुट्टीदिवशी थोपटेवाडी मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल तलाठी सोनवणे व ऑपरेटर वाल्हेकरयांचे आभार ॲड. मोहन थोपटे यांनी मानले.