धक्कादायक : घरात घुसून, हातपाय बांधून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

धक्कादायक : घरात घुसून, हातपाय बांधून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

पुणे

पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात दोन जणांनी घरात शिरून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन  आरोपींनी घरात घुसून मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अशोक हरिभाऊ बनोटे, संदीप भिवसेन सूर्यवंशी असे या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी घरी एकटीच होती. तिच संधी साधून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून अशोक हरिभाऊ बनोटे आणि त्याचा एक  साथीदार संदीप भिवसेन सूर्यवंशी याने पीडितेला मारहाण करून कापडाने तिचे हातपाय, तोंड बांधून दोन्ही नराधमांनी  या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये आळेफाटा पोलिसांनी गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

आईच्या फिर्यादीवरून आरोपीच्या वर्णनाप्रमाणे फरार आरोपी यांचा तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून पुणे ग्रामीणचे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे संदीप भिवसेन सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने तात्काळ अटक केली. दोन्ही नराधमांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *