पुरंदर
सासवड माळशिरस यवत रस्त्यावरील वनपुरी नजीक असलेल्या बाजारपेठ चौकातील दिशादर्शक फलकच चुकीचा लावण्यात आला आहे.यावरती सोनोरी गावचे नाव सोनारी तर कुंभारवळण गावचे नाव कुंभारीवळण अशी चुकीची नावे लिहिण्यात आलेली आहेत.यावरून संबंधित विभागाला परिसरातील गावांची नावे तरी माहिती आहेत का ? हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे.
सासवड माळशिरस यवत रस्त्यावरील वनपुरी गावाजवळअसलेलाचौक(चौफुला)वनपुरी,कुंभारवळण,सोनोरी व परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर(शेतात केलेल्या कष्टाची पावती) ठरत आहे.परिसरातील शेतकरी रोजच्या रोज आपल्या शेतातील माल घेऊन वनपुरी नजिक असलेल्या चौफुला येथे विक्री करतात.यातून मिळणाऱ्या तुटपुंजी रकमेतून कसाबसा घर खर्च भागवतात.
या ठिकाणी परिसरातील नागरिकां बरोबर हडपसर वरून जेजुरीला व सासवड वरून यवत ला जाणारे प्रवाशी देखील येतात.अनेकांना परिसरातील गावांना जाणाऱ्या रस्त्याविषयी माहिती नसते.यासाठी या चौकात दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहे.मात्र या दिशादर्शक फलकावर्तीच गावांची नावे चुकीची लिहिण्यात आलेली आहेत.यामुळे अनोळखी प्रवाशांची दिशाभूल होऊ शकते.यामुळे दिशादर्शक फलकावरती गावांची लिहिलेली चुकीची नावे दुरुस्त करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
संशोधनाचा मुद्दा :
संबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावताना अनोळखी नागरिकांना योग्य गावी जाता यावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला असतो.मात्र या चौकातील दिशादर्शक फलक लावताना कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे.