पुरंदर
पिसर्वे(ता, पुरंदर)येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात(दि,२६) रोजी नियोजनपूर्वक कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा व्यक्तींसाठी ५० व पहिला डोस साठी ५० असे एकूण १०० डोस शासनाकडून मिळाले होते. अनेक नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले होते.
तर पहिला डोस अनेक दिवसांनी आल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.मात्र समुदाय आरोग्याधिकारी रेणुका खोडवे, आरोग्य सेवक नवनाथ जायभाय, आशा सेविका प्रियांका जगताप, वैशाली देवकर,सोनाली वाघमारे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या डोस संबंधी नागरिकांना योग्य माहिती देत नियोजपूर्वक लसीकरण पूर्ण करून घेतले.नागरिकांनीही रांगेत उभे राहून लसीकरण करून घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
पिसर्वे (ता, पुरंदर)येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रांगेत उभे राहून लसीकरण करून घेताना नागरिक.