विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात केली  धक्काबुक्की – अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांचा आरोप

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात केली धक्काबुक्की – अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांचा आरोप

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. आज पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केला आहे. भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचे ना. नवाब मलिक म्हणाले. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात येण्यासारखी घटना घडणे अत्यंत दुःखद आहे.

पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भारतीय जनता पक्ष्याचे आमदार अध्यक्ष्यांच्या टेबल कडे जाऊन त्यांचा माईक उचलून त्यांना धक्काबुक्की केली असा आरोप ना. नवाब मलिक यांनी केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांच्या नेतृत्वा खाली हि सर्व घटना घडली असे ते म्हणाले.

भाजपा नेते आता धमकी, गुंडगिरीचं काम करत आहेत. महाराष्ट्र आघाडी सरकारमधील तीनही पक्ष हे लोकशाहीविरोधी वर्तन कदापिही सहन करणार नाहीत, असे मलिक यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांनी धक्काबुक्की केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपचे १२ आमदारा १ वर्षासाठी निलंबित

सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. यामध्ये अभिमन्यू पवार, पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार,अतुल भातखळकर, शिरीष पिपळे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार बागडिया यांचे निलंबन करण्यात आले.

विरोधी पक्ष्याची सभागृहातील संख्या कमी करण्याचा तसेच सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *