महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोखो आंदोलन

महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोखो आंदोलन

आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरंदर यांच्या तर्फे सासवड या ठिकाणी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोख आंदोलन करण्यात आले. आधीच महागाई ने जनतेचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल चे भाव वाढवून सर्वसामान्यांन वर आर्थिक बोजा वाढवला.

हातात पेट्रोल/डिझेल व घरतगुती गॅस आणि महागाई विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेधाचा फलक घेऊन निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनासाठी पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, माजी उपसभापती मणिकाराव झेंडे पाटील आणि पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *