“मला पदरात घ्या” “या” नवनिर्वाचित खासदारांचा अजितदादांना फोन?शरद पवारांना मोठा धक्का?

“मला पदरात घ्या” “या” नवनिर्वाचित खासदारांचा अजितदादांना फोन?शरद पवारांना मोठा धक्का?

पुणे

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणडे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या गळाला तर लागले नाही ना? अशा चर्चेला आता उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर जवळपास 10 मिनिटे चर्चा झाली आहे. तर शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबतच मोठा दावा केला आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. मला पदरात घ्या, असं सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. अमोल तटकरे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. माध्यमातून एक गोष्ट मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे, तळागाळातील, सोशितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, ऊसतोड कामगारांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे, तो नेता म्हणजे अजित पवार.

त्यामुळे आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला. तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता. पण तो फोन असाही असू शकतो की, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *