ओबीसींच्या आरक्षणास महाविकास आघाडी व नाकर्ते राज्य सरकारचं जबाबदार – पंकजाताई मुंडे  आक्रमक।

ओबीसींच्या आरक्षणास महाविकास आघाडी व नाकर्ते राज्य सरकारचं जबाबदार – पंकजाताई मुंडे आक्रमक।

आरक्षण मिळविल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही , पंकजा मुंडे यांचा इशारा….

ओबीसी आरक्षणासाठी भाजपा आक्रमक 

पुणे:राज्यभरात भाजप चक्का जाम आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’, असा इशारापंकजा मुंडेंनी दिला.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादरकरू शकले नाही. गेल्या 15 महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली.

‘मन मोठे ठेवून निर्णय घेता आले पाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळेजनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे, त्यामुळे आरक्षण मिळवूनदेणारच, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘जोपर्यंत स्थानिका स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. पाचजिल्ह्यात निवडणुका जाहीर झाल्या आहे. हे सरकार निवडणूक आयोगाला पत्र देत आहे. पण, यांनी जर विरोधी पक्षालासोबत घेऊन एक समिती स्थापन करून निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणूक पुढे ढकलता येतील. पण हेसरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलनसुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचेदर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडापोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचेप्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चक्काजाम नंतर राज्य सरकारनेओबीसी आरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असाइशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *