हिवरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामदास कुदळे यांची  बिनविरोध निवड

हिवरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामदास कुदळे यांची बिनविरोध निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असणार्या सासवड या गावाशेजारी वसलेले हिवरे गाव. हिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी रामदास कुदळे यांची हिवरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नऊ सदस्य संख्या असणार्या हिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शोभा दळवी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच पुनम कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली.

उपसरपंच पदासाठी रामदास कुदळे व राजेंद्र जाधव या दोन सदस्यांनी अर्ज केला होता.परंतु राजेंद्र जाधव यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे रामदास कुदळे यांचाच एकमेवच अर्ज वैध राहिल्याने त्यांची हिवरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी पुनम कुदळे यांनी जाहिर केले.

या निवडणुकीसाठी सरपंच पुनम कुदळे तसेच ग्रामपंचायत सदस्य शोभा दळवी,राजेंद्र जाधव,भारती गायकवाड,सागर कुदळे,मनोज कुदळे,सोनाली चव्हाण,पुनम कामठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *