स्वाभिमान सप्ताहानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुरुजनांचा सन्मान सोहळा

स्वाभिमान सप्ताहानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुरुजनांचा सन्मान सोहळा

पुरंदर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीआयोजित अजित स्वाभिमान सप्ताह दुसरा दिवस सासवड शहरातील पुरंदर हायस्कूल, वाघिरे हायस्कूल, कन्याप्रशाला,शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,गुरुकुल विद्यालयातील दहावीतील  प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंतविद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम मा.माणिकराव झेंडे पाटील अध्यक्षपुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

विद्यार्थ्यांनी करोनाच्या या कसोटीच्या काळात चांगल्यप्रकारे आभास करून उज्वल यश संपादन केले.सासवड व पुरंदरतालुक्यातील मुले अभ्यासात कमी पडत नाही आज निकाल पाहता सर्व प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच पटकावले याचामुलांनी विचार करावा लागेल. त्याचबरोबर मुलींना शिक्षणात काही अडचण आल्यास त्यांना योग्य ती मदत केली जाईलअसे यावेळी बोलताना झेंडे पाटील म्हणाले .

शाळेतील काही गरीबमुलांना ऑनलाइन साठी मोबाईल ची गरज आहे अशी सूचना शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनीकेली.गरजू मुलांना मोबाईल किंवा टॅब देण्याची व्यवस्था स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान मार्फत केली जाईल असेसंतोष जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले.सदर प्रसंगी बंडूकाका जगताप कलाताई फडतरे यांनी मनोगत व्यक्तकेले प्राचार्य हनिफ मुजावरव शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनी सत्काराला व विद्यार्थ्यांन मधून  जगताप हिने सत्कारालाउत्तर दिले.

सदर प्रसंगी नगरसेविका मंगलनानी म्हेत्रे,माजी नगराध्यश्या कलाताई  फडतरे, संतोष जगताप,बंडुकाका जगताप, सयाजीवांढेकर,धनंजय जगताप,अमोल शिंदे,मनीष रणपिसे,अतुल जगताप,चेतन जाधवराव, निता सुभागडे,कुमुदिनी पांढरे,तृप्तीशिंदे इ.उपस्थित होते अतुल जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *