स्वतः शेण खाता अन् दाऊदशी संबंध जोडता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे

स्वतः शेण खाता अन् दाऊदशी संबंध जोडता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे

पुणे

शिंंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या प्रकरणावर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सदर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता.राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राहुल शेवाळे यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात सडकून टिका केली आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाने केलेल्या आरोपांवर उत्तर देताना संबंधित महिलेचे पाकिस्तान तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. तसेच तिला राष्ट्रवादीचा सपोर्ट असल्याचाही आरोप केला होता. राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यावर रुपाली ताई ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना, “राहुल शेवाळे स्वतः शेण खातात आणि महिलेचा संबंध दाऊदशी जोडतात, असे बोलताना त्यांना लाज वाटायला पाहिजे,” अशा शब्दात त्यांनी राहुल शेवाळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तसेच ‘राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे’ असेही त्या म्हणाल्या.

याबद्दल अधिक बोलताना रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी, “एकीकडे राहुल शेवाळे महिलेचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करतात तर दुसरीकडे तिच्याशी संबंधही ठेवतात. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी दाऊदच्या जवळच्या व्यक्तीशी संबंध ठेवून देशविरोधी माहिती पुरवली असा अर्थ घ्यायचा का?” असा सवाल केला.तसेच , “राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊदशी संबंध नाही पण ते तसे म्हणत असतील तर त्यांनी देशाच्या विरोधात काम केल्यामुळे शेवाळेंनाच अटक व्हायला पाहिजे,” असेही रुपालीताई म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *