सिंचन योजना उशाला मात्र ; पुरंदरच्या शेतकर्यांच्या कोरड घशाला !!!!!

सिंचन योजना उशाला मात्र ; पुरंदरच्या शेतकर्यांच्या कोरड घशाला !!!!!

पुरंदर

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागात पुरंदर उपसा व जनाई शिरसाई योजना कार्यान्वित करण्यात आली.यामुळे बहुतांश शेती क्षेत्र बागायती झाले.मात्र वारंवार विजेचा लपंडाव,व नियोजनाचा अभाव काही प्रमाणात जाणवत असल्याने सिंचन योजना उशाला असून देखील शेतकऱ्यांची परवड होत आहे.    

पुरंदर उपसा : पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे पूर्व भागातील शेती बागायती होण्यास मदत मिळाली.त्याच बरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन सारख्या व्यवसायात प्रगती होत गेली.मात्र अनेक वर्ष पुरंदर उपसा सिंचन योजनेची देखबाल दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी चोरी व मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.यामुळे शेतकऱ्यांना हवे तेवढ्या प्रमाणात पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते.अनेक ठिकाणी ओळखीचा फायदा घेत पाणी चोरी देखील होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.  

जनाई शिरसाई योजना :  पुरंदरच्या पूर्व भागातील राजुरी,रिसे,पिसे व नायगावचा थोडासा भाग जनाई शिरसाई सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येतो.लाभक्षेत्र व सिंचन योजना यामधील अंतर अधिक व पाटाणे पाणी येत असल्याने अधिकचा लागणारा कालावधी यामुळे प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी उशिरा येते.तसेच पैसे भरूनही अनेक दिवस शेतकऱ्यांना पाणी येण्याची वाट पाहावी लागते.यामध्ये योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

शेतकरी कठीण परिस्थितीत आहे,भिषण संकटात आहे,आपले दुर्दैव आहे की प्रत्येक बाब ही निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आणि राजकीय फायदे-तोट्याच्या कसोटीवर पाहून निर्णय होतात परंतु राजकारणा पलीकडे जाऊन या परिस्थितीत संकटात असलेल्या सर्व शेतकर्यांना पाण्यासाठी सहकार्य होणे अपेक्षित आहे,शेतकर्बायांनी आत्कीमहत्या केल्यावरच सरकारला जाग येणार आहे का ? राजकीय स्वार्थ साधायला,मलीदे लाटायला भरपूर विषय आहेत : विठ्ठल रामचंद्र जगताप, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पुरंदर तालुका

विजेचा लपंडाव :  शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचते न पोहचते मागे वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे.आठ आठ तास तर कधी दोन दोन दिवस लाईट येतच नाही.यामुळे पिके जाळण्याचे प्रमाण वाढले आहे.लाईट बिल वेळेवर भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या मागे वारंवार तगादा लावणे मात्र लाईट गेली तर झोपेचे सोंग घेणे अशा प्रकारे महावितरण कंपनीचे कामकाज चालू असल्याने शेतकऱ्यांना पाणी असून देखील स्वस्थ बसावे लागते.शेतकऱ्यांना रात्रीची वीज न देता केवळ दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यामुळे वीज,पुरंदर उपसा,जनाई शिरसाई सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या उशाला असून देखील काही प्रमाणात नियोजनाची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांची परवड थांबता थांबत नाही.

शासनाने पाईप लाईनसाठी आर्थिक मदत करावी  : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेपासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाईप लाईन नाही.यामुळे पाण्याचा अपव्यय,चोरी व पानी गळती होतो.पाईप लाईन करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु पाईप लाईन चा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *