पुरंदर
पुरंदर तालुकाच्या पुर्व भागातील राजेवाडी याठिकाणी सासवड-यवत रस्त्यावर असणार्या पुलाचे काम सुरु आहे.या ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
या कामावरील ठेकेदार अमोल शामराव जाधव यांनी याबाबतीत जेजुरी पोलिस स्टेशन याठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
यात महादेव भगवान खलसे व सुनिता महादेव खलसे तसेच एक अनोळखी अशा तिघांविरोधात तक्रार असुन तब्बल २०५७० रुपये किमतीचा सेंटरींग लोखंडी माल चोरीला गेला आहे.
याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चितारे करीत आहेत.