कार्याध्यक्ष पदी मोहीनी बुल्हे
येवला
सरपंच सेवा महासंघ येवला तालुकाध्यक्षपदी पाटोदा तालुका येवला येथील आदर्श सरपंच प्रताप पाचपुते व शिरसगावतालुका येवला येथील सरपंच मोहिनी ज्ञानेश्वर बुल्हे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचेउपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के व राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर यांनी नुकतीच नाशिक येथे झाली.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य ही सरपंच संघटना सरपंच यांचे न्याय हक्क व मागणीसाठी कामकाज करणारीमहाराष्ट्रातील नोंदणीकृत सरपंच संघटना असून या संघटनेच्या येवला तालुकाध्यक्षपदी पाटोदा येथील सरपंच प्रतापअन्साराम पाचपुते व शिरसगाव येथील सरपंच मोहिनी ज्ञानेश्वर बुल्हे यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचेउपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के व राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर यांनी त्यांच्या कार्याबद्दल त्यांनानियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन केली आहे नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा जिल्हा परिषद नाशिक अध्यक्षबाळासाहेब क्षीरसागर व जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती संजय जी बनकर यांनी पुष्पमाला व शालश्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
तालुक्यातील सर्सव सरपंच यांना सोबत घेऊन कामकाज करू असे नवनियुक्त तालुकाध्यक्ष पाचपुते यांनी सांगितले