संजय राऊत यांची “या” पदावरून उचलबांगडी

संजय राऊत यांची “या” पदावरून उचलबांगडी

पुणे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आले आहे.तर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी संजय राऊत होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं होतं. त्यानंतर संजय राऊत यांची मुख्य गटनेते पदावरुन हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं असून यामध्ये असं म्हटलं की, “२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली या बैठकीत एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्यानं संजय राऊतांची हाकालपट्टी करण्यात यावी. शिवसेनेची मी मागमी मान्य होण्याची शक्यता आहे.

महिन्याभरापूर्वीच संसदेतील मुख्य नेते पदावरुन राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. संसदेत व्हिप काढण्याचा अधिकार संजय राऊत यांना होता, पण आता गजानन किर्तीकर यांच्याकडं हे सर्व अधिकार असतील. शिंदेंच्या सर्व खासदारांकडून किर्तीकरांचा या नियुक्तीबद्दल सत्कारही करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *