संगणक परिचालकांचे एक वर्षाचे अग्रीम मानधन देऊ नये – सरपंच सेवा महासंघ,महाराष्ट्र राज्य

संगणक परिचालकांचे एक वर्षाचे अग्रीम मानधन देऊ नये – सरपंच सेवा महासंघ,महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंच महोदयांना सूचित करण्यात येतो की , ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे १ वर्षाचेअग्रीम मानधन  देण्याबाबत पत्र प्राप्त झालेले आहेत परंतु कुणीही सरपंच यांनी अग्रीम मानधन देऊ नये शासननिर्णयानुसार १५ वित्तचे सर्व पेमेंट PFMS प्रणाली द्वारे ऑनलाइन करण्यात येत आहेत तरी संगणक परीचालकाचेमानधन देण्याकरीता महाराष्ट्र शासन आपल्या पद्धतीने नियमात बदल करून प्रत्येक सरपंचांना मानधन देण्यासबंधनकारक करीत आहे.

राज्यातील सर्व सरपंच यांनी कोणीही संगणक परीचालकांचे  मानधन अदा करू नये.कारण वित्त आयोगाचा निधीग्रामपंचायतला आला तेव्हापासून प्रशासनाच्या डोळ्यात खुपत असून शासन/प्रशासन हा निधी आपल्याला कृतीआराखड्यानुसार खर्च करु देत नाही. तर शासन आपल्या मर्जीनुसार खर्च करण्याच्या विचारात आहे, मग विशेष सभाघेऊन कृती आराखडा तयार करण्याचा सोंग कशाला..?

सरपंचांचे संपूर्ण अधिकार हिरावण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे सरपंच सेवा महासंघ खपवून घेणार नाही… 

याकरिता शासनासोबत कायदेशीर लढाई सुरूच आहे आपण लवकरच विविध मागण्यांसाठी एक दिवसीय ठिय्याआंदोलन करणार आहोत… 

     तरि कोणत्याही सरपंच महोदयांनी संगणक परीचालकांचे अग्रीम पेमेंट देवू नये.अशी मागणी सरपंच सेवा महासंघमहाराष्ट्र यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *