श्रावणी सोमवार निमीत्त गुळूंचे येथील ज्योतिर्लींगाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट.कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही

श्रावणी सोमवार निमीत्त गुळूंचे येथील ज्योतिर्लींगाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट.कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही

नीरा
गुळुंचे (ता.पुरंदर )येथील काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री.ज्योतिर्लींग मंदिराच्या गाभाऱ्यातआजा श्रावणातील पहिल्या सोमवार निमीत्त  फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवभक्त देवराम पाटोळे यांनी ही फुलांची आकर्षक सजावट केली होती. गावातील शिवभक्तांनी शरारिक अंतर व कोरोनाचे नियम पाळत मंदिराच्या बाहेरुनच कळसाचे दर्शन घेण्यात समधाल. मानले. आज कोणालाही मंदिरात दर्शनासाठी जाऊ दिले नाही.


श्रावण महिण्या निमित्त दरवर्षी गुळुंचे येथील ज्योतिर्लींग देवाच्या मंदिरामध्येदर्शनासाठी भाविक गर्दी करीत असतात. मात्र गेल्या वर्षी व या वर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने गावातील लोकांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यात धन्यता मानल. मंदिर बंद असल्याने बाहेर गावच्या कोणीही दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देवस्थानाच्या पंच कमिटीने केले आहे.श्रावणातील पुढील सोमवारी सुध्दा लोकांना दर्शनासाठी हे मंदिर बंदच असणार आहे.


आज दि. 9 ऑगस्ट रोजी पहाटे मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर पुजारी व पुरोहित यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. दर वर्षी मानाच्या पाटलांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर शेकडो युवक दुपार पर्यंत ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला अभिषेक करतात. मात्र यावर्षी कोणालाही वैयक्तिक अभिषेक घालता आला नाही. परगावाहून कोणीही दर्शनासाठी येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. स्थानिक भाविकांनी ही वेगवेगळ्या वेळेत कळसाचे दर्शन घेतले. महाद्वारावर बांबू लावुन मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करीत येथील भावीकानी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे.मात्र त्याच बरोबर हा कोरोंना आजार लवकर जाऊदे अशी प्रार्थना भाविकांनी शंभू महादेवाचे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *