पुणे
पुरंदर: लक्ष्मी मुक्ती योजने द्वारे महिलांचे नाव शेतीवर लावण्यासाठी मासुम संस्था पुरंदर तालुक्यातील ४० गावांमध्येअभियान राबवित आहे. या अभियानाला कालपासून सुरुवात झाली आहे.समाजात व कुटुंबामध्ये स्त्रियांना शेतकरी म्हणूनमान्यता मिळावी,शेतीच्या योजनांचा लाभ मिळावा तसेच स्त्रियांचा सन्मान वाढावा. यासाठी महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळमासूम संस्था महिलांचे नाव शेतीवर लावण्यासाठी काम करत आहे. मागील दोन वर्षांपासून गावांमध्ये जाणीवजागृतीकरून महिला व पुरुषांबरोबर चर्चा करुन महिलांची नावं शेतीवर लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुरंदर तालुक्यातीलकाही गावांमधून तहसील कार्यालयात अंदाजे १०० अर्ज लक्ष्मी मुक्ती योजनेचे दाखल केले आहेत. महिलांचे नाव सह-हिस्सेदार म्हणून लावण्यासाठी मासुमचे कार्यकर्ते मार्गदर्शन व मदत करत आहे. या अभियानात समाज,कुटुंब व शासकीययंत्रणा या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर महिलांना संपत्तीत हक्क प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल होईल व पुरंदरतालुका एक रोल मॉडेल होईल. सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या पत्नीचे व घरातील महिलांचे भविष्यसुरक्षित करुयात. शेतीवर नाव लागल्याने महिला व कुटुंबाला फायदाच होणार आहे.शासकीय योजनांचा फायदामहिलांना सवलतीमध्ये मिळत आहे. शेती साठी कोणतेही अवजार खरेदी करायचे असल्यास जर महिलेच्या नावावर शेती असल्यास ६०% अनुदान मिळते. महिलेच्या नावावर ट्रॅक्टर खरेदी केला तर पुरुषांपेक्षा १०% अनुदान महिलेला जास्त मिळते.
महिलेच्या नावावर शेती असल्यास बीयाणे, खत यांचा लाभ मिळतो.फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळे, यासाठीलाभ घेऊ शकतो. राष्ट्रीयकृत बँक कडून बिनव्याजी पीक कर्ज मिळते. शेतीसाठी विद्युत मोटर, पी.व्ही.सी पाईप यांच्यासाठी अनुदान मिळते.
लक्ष्मी मुक्ती योजनेद्वारे सातबार्यावर पतीच्या नावाबरोबर सह-हिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव लावण्याचे आवाहनमासुमच्या सहसंयोजक जयश्री नलगे यांनी केले आहे.