शिववसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न

शिववसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न

दि.18 जुलै रोजी अभियानाचे  सत्यवान उभे यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

बारामती 

प्रतिनिधिकल्पना जाधव

शिवसेनेच्या गाव तेथे शाखा पोहचवून सभासद नोंदणी करून प्रत्येक शाखेवर जावून दि.12 जुलै ते 24 जुलै 2021 दरम्यानशिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून हे रयतेचे राज्य असल्याची अनुभूती जनसामान्यांना करून देण्यासाठी माळेगाव(ता.बारामती) याठिकाणी बारामती तालुका महिला संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांच्या नेतृत्वाखालीतालुक्यातील महिलांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस शिवसेना बारामती तालुकाप्रमुख विश्र्वास मांढरे, माळेगाव खुर्द शाखा प्रमुख नितीन काटे यांचे मोलाचेमार्गदर्शन लाभले. या बैठकीत महिला ध्येय धोरणांची माहिती देण्यात आली. यावेळी सारीका आटोळे, जोस्ना सोलनकर, राजश्री पवार, संगिता शिंदे, ताई अवघडे, सायली मोरे, अश्र्विनी सावंत, सुनिता अडागळे, प्रविणा सस्ते, निता कुचेकर, मिनाक्षी जाधव, सारिका खोमणे, अनिता जगताप, योगिता वाईकर इ. महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला 

दि.18 जुलै रोजी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या हस्ते उद्घाटन होणारआहे. यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख ऍड.राजेंद्र काळे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे व महिला संघटक संपर्क प्रमुखशालीनीताई देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *