शाळेतील खळबळजनक प्रकार!!!!!                    नववीत शिकणाऱ्या वर्गमित्रांमध्ये किरकोळ वाद,दप्तरातून कोयता काढत केला मानेवरच वार

शाळेतील खळबळजनक प्रकार!!!!! नववीत शिकणाऱ्या वर्गमित्रांमध्ये किरकोळ वाद,दप्तरातून कोयता काढत केला मानेवरच वार

पुणे

सांगलीतील एका हायस्कुलमधील विद्यार्थ्याने वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला आहे. शहरातील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या प्रकाराने शाळेत मुलांचे चाललेय तरी काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान जावेद मुल्ला आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी (२९ जानेवारी) दप्तरातून कोयता आणला होता.

सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला.

जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तेथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर बनली आहे. सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *