वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा !!!! विजेच्या समस्येने बेजार; टावरवर चढत “या”गावकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा !!!! विजेच्या समस्येने बेजार; टावरवर चढत “या”गावकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

हिंगोली

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा गावात विजेच्या प्रश्नावरून वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. संतप्‍त झालेल्‍या गावकऱ्यांनी थेट टावरवर चढून आंदोलन केले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा गावात विजेच्या प्रश्नावरून वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.

संतप्‍त झालेल्‍या गावकऱ्यांनी थेट टावरवर चढून आंदोलन केले.हिंगोली जिल्‍ह्यातील सुरजखेडा गावाला गेल्या अनेक दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नाही. वीज पुरवठा होत नसल्याच्या आरोपावरून गावकऱ्यांनी गावात असलेल्या टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे.

गावातील शेकडो नागरिक आंदोलन करत असताना 30 ते 40 नागरिक अचानक टॉवरवर चढल्याने या गावकऱ्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे.टावरवर चढलेल्‍या नागरीकांना उतरविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्‍न सुरू आहेत. मात्र गावाला सुरळीत वीज पुरवठा सुरू होत नाही; तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *