वाहनाच्या धडकेने पुरंदरमधील “या” गावातील एक ठार

वाहनाच्या धडकेने पुरंदरमधील “या” गावातील एक ठार

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील टेकवडी या गावातील ८२ वर्षीय वृद्धाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

पोलिस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार,सुनिल बबन खांडगे यांनी अशाप्रकारे फिर्याददिली की,माझे वडील बबन महादेव खांडगे वय 82 वर्ष टेकवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे आमची डिस्कवर मोटर सायकल नंबर एम एच 14 सीबी 8309 ह्या मोटरसायकल वरून सासवड ते वाघापूर रोड वरून जात असताना उदाची वाडी फाटा समोर रोडवर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक देऊन त्यात वडिलांचे गंभीर दुखापती होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे व अपघाताची खबर न देता निघून गेला म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *