वाह रे सरपंच!!!!             चार लाख बिल देण्यासाठी मागीतले आठ टक्के;बत्तीस हजाराची लाच घेताना सरपंचला अटक

वाह रे सरपंच!!!! चार लाख बिल देण्यासाठी मागीतले आठ टक्के;बत्तीस हजाराची लाच घेताना सरपंचला अटक

पुणे

जालणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या चार खोल्याचे बांधकाम करणाऱ्या गुतेदाराला बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायत खात्यात कामाचे चार लाख रुपये बिल आले होते. हे बिल देण्यासाठी देयकावर सही करण्यासाठी ८ टक्‍क्यांप्रमाणे ३२ हजाराची लाच घेताना सरपंचला पंचासमक्ष अटक केली. ही घटना परंतुर तालुक्यातील रोहिणा बुद्रुक गावात घडलीय. जसाराम आसाराम तुंभारे असे या अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे.

रोहिणा बुद्रुक गावात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चार खोल्याचे बांधकाम करण्याची मंजुरी मिळाली होती. सदरील काम पूर्ण झाल्यानंतर गुतेदरांनी इस्टिमेटप्रमाणे बांधकाम विभागात सादर केले. यानंतर बांधकाम विभागाने बिल मंजूर करून कामाची पूर्ण देयक ग्रामपंचायत खात्यात वर्ग केले होते.

दरम्यान या कामाचे देयक मिळण्यासाठी गुत्तेदाराने रीतसरपणे ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली होती. ग्रामसेवकाने चार लाखाचे देयक तयार करून त्यावर सही केली. मात्र या देयकावर सही करण्यासाठी सरपंच जसाराम आसाराम तुंभारे यांनी गुत्तेदाराकडे आठ टक्के प्रमाणे बत्तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

गुत्तेदारालाही लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागाने लाच मागणीबाबत पडताळणी केली असता सरपंच तुंभारे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून पंचासमक्ष सरपंचाला बत्तीस हजाराची लाच घेताना पंचायत समिती कार्यालय परतूर येथील रोडवर अटक केली. सरपंचाविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्या एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *