मावळ
पवन मावळ मधील मोर्वे गावात येळशे प्राथमिक आरोग्य केंद्र व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वटपौर्णिमेचा सुवर्ण मुहूर्तसाधत गावातील महिलांची कोविड टेस्ट करण्यात आली. शहरी भागासहित ग्रामीण भागात सुद्धा वाढत चाललेल्याकोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी टेस्ट अतिशय फायदेशीर ठरत आहे.यातून ज्या महिलांचे रिपोर्टपॉझिटिव्ह येत आहेत त्यांना तातडीने आमदार सुनीलआण्णा शेळके व महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोविड सेंटर मध्येदाखल करत उपचार सुरू करण्यात येत आहे. या कोरोना चाचणीमुळे गाव-गावामध्ये वाढणाऱ्या कोरोना ला नक्कीचअटकाव होण्यास मदत होणार आहे.ही चाचणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने घेण्यात आली.
या कामात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सुचित्रा महापुरे(आरोग्य सेविका), सर्जेराव पाखरे(शिक्षक), भाग्यश्रीशिंदे(आशा सेविका), सुनंदा घारे(अंगणवाडी सेविका), आप्पा भानवसे(ग्रामसेवक), सुनील शिंदे (सरपंच), अनिकेतगाउडसे(ग्रा.पं. कर्मचारी) त्याचप्रमाणे गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे महत्वाचे योगदान लाभले.येळशे प्राथमिकआरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग कोरोना काळात देत असलेल्या सेवा उल्लेखनीय आहेत.
“या कार्याबद्दल वरील सर्वांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे-सचीन घोटकुले,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे जिल्हा”