पुणे
पाकिस्तानमध्ये लाइव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान झालेल्या दोन गेस्टमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पीएमएल-एनचे दोन नेते एकमेकांशी भिडले. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चॅनलच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला.
पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) सिनेटर अफनान उल्लाह खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते आणि वकील शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानी अँकर जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस न्यूज टॉक शोमध्ये चर्चेत सहभागी झाले होते.
तिथे एका मुद्द्यावर अचानक वादविवाद सुरू असताना अचानक दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यादरम्यान दोन्ही नेत्यांना एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.