यांना विधिमंडळ कामकाजात रस नाही बाकींच्या कामात रस ..हा तर निर्लजपणाचा कळस; भर विधानसभेत अजितदादा संतापले नेमकं काय घडलं?

यांना विधिमंडळ कामकाजात रस नाही बाकींच्या कामात रस ..हा तर निर्लजपणाचा कळस; भर विधानसभेत अजितदादा संतापले नेमकं काय घडलं?

पुणे

सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच, राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी आज विधीमंडळातील अधिवेशनाला दांडी मारली. यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

या अधिवेशनात राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच, राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी आज विधीमंडळातील अधिवेशनाला दांडी मारली.

यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांचा मुद्दा, अशा लक्षवेधी मुद्द्यांवर विधिमंडळात चर्चा होणे अपेक्षित असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी अधिवेशनाला अचानक दांडी मारली.

त्यामुळे आज ८ पैकी केवळ एका लक्षवेधीवर चर्चा झाली. मंत्री उपस्थित नसल्याने ७ लक्षवेधीवरील चर्चा उद्यावर ढकलण्यात आली.यावर अजित पवार चांगलेच संतापले. आज एकच लक्षवेधी झाली. सभागृहात मंत्री हजर नाही म्हणून इतक कामकाज थांबवले. देवेंद्रजी तुम्हाला sincere म्हणून बघतो. पण तुमचे लक्ष नाही. चंद्रकांत पाटील यांनी लवकर उठून आले पाहिजे.

इतर मंत्र्यांनी सुद्धा सभागृहात वेळेवर हजर राहिलं पाहिजे. यांना विधिमंडळ कामकाजात रस नाही बाकींच्या कामात रस आहे. हा तर निर्लजपणाचा कळस झाला, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *