मोदींनी लस तयार केली तर संशोधक *** उपटत होते का?

मोदींनी लस तयार केली तर संशोधक *** उपटत होते का?

पुणे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वार प्रहार होत आहेत.  शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

त्यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना  भलताच दावा केला होता. मोदींनी लस तयार केली म्हणून 100 देश वाचले असा दावा फडणवीस यांनी केला होता. मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कल्याणमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी. मोदींवर टीका करणे म्हणेज सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत निशाणा साधला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *