माझी माणस माझी जबाबदारी” संकल्पनेतून जेजुरीत लसीकरणास सुरुवात

माझी माणस माझी जबाबदारी” संकल्पनेतून जेजुरीत लसीकरणास सुरुवात

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

कोरोणा विषाणूच्या वाढत्या संसर्गावर मात करण्यासाठी जेजुरीचे मा.नगराध्यक्ष श्री.दिलीपदादा बारभाई यांच्या मार्गदर्शनाखाली “माझी माणस माझी जबाबदारी ” या संकल्पनेतून शांताई प्रतिष्ठान जेजुरी , जयमल्हार पतसंस्था जेजुरी , तसेच श्री.सुभाषमामा दरेकर, श्री.बाळासाहेब दरेकर , युवा नेतृत्व श्री.सागर सुभाषमामा दरेकर , डाॅ.प्रशांत दरेकर व जे.न.प.च्या मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई दरेकर यांच्या वतीने जेजुरी येथील रेल्वेस्टेशन परिसर,एकता नगर,शेवाळे वस्ती, खोमणे वस्ती,हरपळे वस्ती या परीसरातील नागरीकांसाठी मोफत लसीकरनाचा शुभारंभ करण्यात आला.

युवकांचे आशास्थान आणि जेजुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जयदिपभैया बारभाई यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी मा.नगरसेवक मेहबूबभाई पानसरे, बाळासो माने,अमोल शेवाळे , प्रसाद माने, साजीद मुलाणी, धिवार साहेब, शुभम माने, अक्षय माने, तुषार दरेकर, वैभव कोरपड, उन्मेष बारभाई, धनंजय गोडसे, प्रशांत कापसे व रेल्वेस्टेशन परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *