दौंड
महाराष्ट्रातील राजकारण पाहता राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे.यातच दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बादशाह शेख यांनी पक्षात खासदार सुप्रिया सुळे आणि दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम केला आहे.
बादशाह शेख यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली यामध्ये प्रामुख्याने दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासारखा खोटारडा माणूस माझ्या राजकीय कारकिर्दीत पाहिला नाही असे सांगीतले.
माझ्या समर्थकांची आणि माझ्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून पुढे नेमके काय करायचे हे ठरवणार असल्याचे बादशहा शेख यांनी सांगितले.
बादशाह शेख हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्य करत होते. ज्या पक्षासाठी मी रस्त्यावर उतरून काम केले,प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहिलो असे असताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहीलो,जर प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्षात अपमान होत असेल तर घरी बसू परंतु अपमानित होऊन राजकारण करणार नाही अशी खंत बादशाह शेख यांनी व्यक्त केली.
दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सच्चा कार्यकर्त्याला किंमत राहिली नसून चमचेगिरी आणि हुजरेगीरी करणार्या पदाधिकाऱ्यांची पक्षाला गरज आहे आणि त्यामुळे मी हा माझा अपमान आहे असे समजुन नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर पालिकेतील गटनेते बादशाह शेख यांनी केले.