महिला सरपंचासोबत थाटामाटात केला होता प्रेमविवाह ; “या” गावच्या उपसरपंचावर जीवघेणा हल्ला

महिला सरपंचासोबत थाटामाटात केला होता प्रेमविवाह ; “या” गावच्या उपसरपंचावर जीवघेणा हल्ला

अमरावती

उपसरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील सरपंच महिलेसोबत उपसरपंच लग्नबंधनात अडकले होते. महिला सरपंच आणि उपसरपंच यांचा प्रेम विवाह झाला होता.

या पार्श्वभूमीवर उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या कांडली गावात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उपसरपंच धंडारे यांच्या पाठीवर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. रोहित मरसकोल्हे या आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.

सध्या उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र अमरावतीच्या कांडली गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *