महाराष्ट्र हादरवणारी बातमी !!!!!                   चक्क “या” गावात महिला सरपंचाला पतीने मारहाण करत राजीनामा द्यायला भाग पाडले

महाराष्ट्र हादरवणारी बातमी !!!!! चक्क “या” गावात महिला सरपंचाला पतीने मारहाण करत राजीनामा द्यायला भाग पाडले

पुणे

सतरा हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिंगोलीच्या गोरेगाव ग्रामपंचायतीत महिला सरपंच पद राखीव होते. यामुळे महिलेची निवड करण्यात आली होती.

मात्र या महिला सरपंचाला पतीने मारहाण करत राजीनामा देण्यास भाग पडले. पत्नीने याबाबत ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे.

यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनंतर मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने कायदा लागू केला, मात्र या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत पुढे आला आहे.

जिल्ह्यातील १७ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिंगोली तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गंगुबाई कावरखे या सरपंचपदावर विराजमान होत्या. मात्र त्यांना पतीने मारहाण करत सरपंचपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.

ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत स्वतः महिला सरपंचाने खुलासा करत सरपंचपदाचा राजीनामा देण्यास दबाव टाकणाऱ्या पतीवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *