महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दौंडज मधील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स पुस्तकांचे वाटप

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दौंडज मधील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स पुस्तकांचे वाटप

पुरंदर

दौंडज येथील भारती विद्यापीठाचे,  शिक्षण महर्षि डाॅ. पतंगराव कदम विद्यालय, दौंडज मध्ये महाराष्ट्र राज्याचेउपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिंक्य भैय्या टेकवडे युवा मंच दौंडजयांचे तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स च्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

ऑन लाईन शिक्षणासाठी या गावातील ब-याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यामध्ये खूपअडचणी येत आहेत या बाबत पालकांकडून सूचना येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन या गावातील माजी विद्यार्थ्यांनीएकत्र येऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याची खूणगाठ बांधली.या कामी युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी या कामी खूपआर्थिक सहकार्य केले. 

या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी चेअरमन श्री. दिगंबर दुर्गाडे,माजीपरिषद सदस्य श्री. विराजभैय्या काकडे,युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे,विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. संदेश पवार,श्री. हनुमंत पवार, सरपंच सीमा भुजबळ, ग्रा. पं.सदस्य  श्री. विजय फाळके,  मा.चेअरमन अमोल कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम,सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, फाळके,मा. सरपंच  दामुअण्णाकदम,  मा. ग्रा. पं. सदस्य महादेव माने, श्री.  संभाजी आबा कदम,ग्रामसेवक सुनिल माने, नितीन कदम,अशोकहवालदार,काळूराम कदम रूपेश इंदलकर, वरूण भोईटे, शरद जाधव, उमेश इंदलकर, अनिकेत माळवदकर मुख्याध्यापक श्री. सुधाकर गोतपागर सर, श्री. भगवान तुपे सर,श्री. दिलीप निंबाळकर सर, सौ. शोभा काळखैरे मॅडम,  श्री. अमिन तांबोळी सर, माया कचरे मॅडम , श्री. भगवान जगताप, श्री. सुनिल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जालिंदर घाटे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *