ब्रेकअप केल्याचा मनात राग, पुणे जिल्ह्याच्या “या” गावातील प्रियकराने प्रेयसीचे चक्क विवस्त्र फोटोच स्टेटसवर ठेवले!!!!!

ब्रेकअप केल्याचा मनात राग, पुणे जिल्ह्याच्या “या” गावातील प्रियकराने प्रेयसीचे चक्क विवस्त्र फोटोच स्टेटसवर ठेवले!!!!!

पुणे

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या रागातून प्रियकराने चक्क प्रेयसीचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित केले आणि तिची बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील एका तरुणाच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि फुलफगर यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.

त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने फुलफगर याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले.ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी तरुणीला त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून तिने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे फुलफगर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.फुलफगर गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीवर दबाव आणत होता.

‘ये तो अभी शुरुवात है’ असा इशारा त्याने दिल्याचा आरोप आहे. गुन्हा मागे न घेतल्याने त्याने प्रेयसीचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्याचा आरोप आहे.एक डिसेंबरला घडलेला हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *