अमरावती
पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे आमदार रवी राणा आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची बाचाबाची झाली. त्यावेळी रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरयांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. याटीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. यावर मी ज्यांना ओळखतनाही त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही,” असं टोला नवनीत राणांनी रुपाली चाकणकरांना हाणला.
“मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्नकरेल,” असंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.