बघा आता चोरांची डेअरींग !!!!     पुण्यातील “या” ठिकाणावरुन चक्क पीएमपीएलची बसच चोरण्याचा केला प्रयत्न

बघा आता चोरांची डेअरींग !!!! पुण्यातील “या” ठिकाणावरुन चक्क पीएमपीएलची बसच चोरण्याचा केला प्रयत्न

पुणे

महानगरपालिकेजवळील पीएमपीएल स्थानकातून दोघांनी दिवसाढवळ्या बस पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.हा प्रकार 15 ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली.सुरज शशिकांत जडिये (वय -35 रा. कोथरूड) आणि मोहित अविनाश चव्हाण (वय -26, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जालिंदर खंडाळे  (वय -27 रा. पर्वती ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर हे महानगरपालिकेजवळील  पीएमपीएल थांबा परिसरात सुरक्षारक्षक आहेत. 15 ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास आरोपी सुरज आणि मोहित यांनी परिसरातील बसक्रमांक एमएच 14 आयएन 6208 ही बस गेटच्या विरूद्ध दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी जालिंदरने बसचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. दोघा चोरट्यांनी बस घेउन जाताना केबीनचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे  तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *