फेसबुकवरील मैत्री महागात, “या” सरकारी कर्मचाऱ्याची सव्वा दोन लाखाची फसवणूक

फेसबुकवरील मैत्री महागात, “या” सरकारी कर्मचाऱ्याची सव्वा दोन लाखाची फसवणूक

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली. या अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचा शोध सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.अहमदनगरला कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे. शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैशांचा फंडा सांगून राशीनच्या सरकारी कर्मचाऱ्याला गंडा घालण्यात आला.

त्याची तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.राहुलकुमार श्रीधर राऊत असं या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना राहुल नामदेव कवाडे याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. नंतर विश्वास संपादन करून व्हॉट्सअपवर तर कधी फोनवर बोलणे सुरू झाले.

नंतर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली.आरोपी राहुल कवाडेच्या विनंतीला प्रतिसाद देत राहुलकुमार श्रीधर राऊत यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली अन् तिथेच घात झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *