प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशिन व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशिन व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

मोडनिंब

BBMAK SANGH INDIA व धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित
धनश्री महिला सक्षमीकरण केंद्र मोडणींब या प्रशिक्षण सेंटर मध्ये शिलाई मशिन प्रशिक्षण कोर्स पुर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशीन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम मोडणींब येथील राज इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सांस्कृतीक हाँल मध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाला कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई चे सचिव तथा नवक्रांती शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.धंनजय घुले सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

सदर प्रसंगी बोलताना BBMAK SANGH INDIA ( परीवाराचे तथा धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.संजयजी रणदिवे सर यांनी कोरोना काळात देशातील लाखो उद्योग बंद पडलेने दिड कोटी जनतेचा रोजगार गेला असुन देशात बेरोजगारीचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे BBMAK संघाची स्थापनाच मानवता हा एकच धर्म आणि आर्थिक मागास एकच जात व यांचा सर्व पातळीवर सर्वांगीण विकास याच उद्देशाने करण्यात आली असुन बेरोजगारीची संख्या कमी करायची असेल तर पुस्तकी ज्ञाना पेक्षा रोजगार निर्माण करणारे शिक्षण घेणे ही आज काळाची गरज असुन कुटुंबाचा आधार असलेल्या महिला भगिनींनी नोकरीच्या मागे न धावता कौशल्य आत्मसात करुन स्वयंरोजगार सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे.

धनश्री एज्युकेशन ग्रुपने मोडणींब मध्ये राबवलेला हा प्रोजेक्ट आपल्या समोर आज यशस्वी करुन दाखवला असुन ‘मोडणींब पँटर्न’ धनश्री एज्युकेशन ग्रुपचे मँनेजिंग डायरेक्टर मा. दिपकरावजी काळे साहेब तसेच धनश्री ग्रुपचे महा. प्रकल्प संचालक मा. अजितजी केळकर सर यांचे मार्गदर्नाखालील महिला सक्षमिकरण विभागाच्या मा.सौ. सुजाता गलांडे मँडम मा. शिला ताई डावरे तसेच विभाग प्रमुख मा. सौ. रेखाजी बागुल मँडम, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष मा. वनिताजी कोरटकर मँडम यांच्या नेतृत्वाखालील टिमच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल धनश्री ग्रुप माढा तालूक्यात लवकरच विविध प्रशिक्षण सुरु करणार असुन तालुक्यातील बेरोजगार युवक, युवती व गृहीणी महिलांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार उभारावा तुम्ही जर सक्षम झाला तरच समाज सक्षम होईल पर्यायाने गाव जिल्हा राज्य व देश सुध्दा सक्षम झाल्या शिवाय राहाणार नाही, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, तर बहुजन सत्यशोधक संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुनीलजी ओहोळ सर यांनी महिलांनी शिक्षणाची कास धरुन स्वतःच्या कुंटुबाच्या प्रगती कडे लक्ष द्यावे.

टीव्हीच्या मालिकेतील नट नट्यांच्या लग्नाच्या तारखा लक्षात न ठेवता धनश्री सक्षमिकरण केंद्रात तेवढा वेळ प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या मुलीच्या खर्चाच्या तरतुदी साठी स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा तसेच BBMAK संघ व धनश्री ग्रुपच्या अशा प्रकारच्या समाज हिताच्या कार्याला बहुजन सत्यशोधक संघांचे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सहकार्य करेल असे म्हटले तर मोडणींब ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. दत्ताभाऊ सुर्वे साहेब यांनी BBMAK संघांचे काम हे अतिशय उत्कृष्ट असुन ते आम्ही स्वतः अनुभवत असुन कोरोणा काळात मोडणींब शहरात सर्व पक्ष व संघटनांनी केलेल्या समाज कार्याबद्दल संटनेने सर्व मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन उचीत सन्मान करुन आमच्या कामाचे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *