पुरंदरमधील “या” सोसायटीवर शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता । कॉंग्रेसच्या पंचवीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग

पुरंदरमधील “या” सोसायटीवर शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता । कॉंग्रेसच्या पंचवीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग

पुरंदर

बांदलवाडी ता पुरंदर येथील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुक प्रक्रियेत शिवसेना राष्ट्रवादी युतीने निर्विवाद सत्ता आज मिळवली. कॉंग्रेस पक्षाची या सोसायटीवर असलेली २५ वर्षांची सत्ता दोनही पक्षांनी एकत्र येत धुळीस मिळवली. 

राष्ट्रवादीची नेते अंकुश परखंडे व शिवसेना वीर भिवडी गणाचे अध्यक्ष प्रशांत शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताञय पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ विकास आघाडी पॅनेलने एकहाती विजय संपादन केला. या निवडणुकीत १३ पैकी १२ जागा मिळवत सेना राष्ट्रवादीने बाजी मारली.
 
काँग्रेसचा एक आणि सेना राष्ट्रवादी युतीचा एक अशा दोन जागा आधीच बिनविरोध निवडुन आल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक झाली पण त्यात कॉंग्रेसच्या हाती भोपळा लागला.  नवनियुक्त संचालकांचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव, अंकुश परखंडे, हरिभाऊ लोळे यांनी अभिनंदन केले.
 
निवडुन आलेले सदस्य पुढीलप्रमाणे शिवाजी विठ्ठल पेटकर,अंकुश दिनकर पेटकर,अशोक नरसिंग पेटकर,संजय कॄष्णा जाधव,नारायण विठ्ठल जाधव,बाबासाहेब महादेव लोखरे,जयसिंग बापु आमराळे,परशुराम बबन आमराळे,चंदर बाबुराव नारगे,पेटकर इंदुबाई बबन,मंगल नवनाथ आमराळे,बाळू मारुती कोकरे,संतोष संपत जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *