पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पारगाव याठिकाणी रेल्वेच्या रखडलेल्या अंडरपासच्या कामामुळे पारगाव,पिसर्वे,राजुरी,नायगाव,रिसे,पिसे,सुपे,खानवडी,कुंभारवळण, सासवड या मार्गावरील पुर्ण वाहतुक विस्कळीत झालेली आहे.
शेतकर्यांचा शेतीमाल, त्याचबरोबर विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर प्रवाशी यांचे मागच्या एक वर्षापासुन खुप मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
गेल्या एक वर्षापासुन हे काम अत्यंत धीम्या गतीने चालु असुन रखडलेल्या कामामुळे नागरीकांच्या भावना लक्षात घेता हे काम येत्या आठ दिवसात सुरु न केल्यास महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच ३० जानेवारीला भुयारी मार्गाच्या समोरच अमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे अपंग विकास संघातर्फे अमोल बनकर यांनी सांगीतले.