पुरंदर हादरला!!!!!!        सासवडमध्ये भरदिवसा गोळीबार; “या” ठिकाणी थरार,नेमकं काय घडलं?

पुरंदर हादरला!!!!!! सासवडमध्ये भरदिवसा गोळीबार; “या” ठिकाणी थरार,नेमकं काय घडलं?

पुणे

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार मध्ये एक जण गंभीर रित्या जखमी झालाय. तर या संदर्भात स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानका समोर हा प्रकार घडला असून तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय. यावेळी एकावर गोळी झाडण्यात आलीय. गोळीबार यामध्ये 41 वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीर रित्या जखमी झाले.

पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी राहुल टिळेकर यांना नेण्यात आलं आहे. सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात अशी प्राथमिक माहिती मिळतेय. दुपारी चार वाजलेच्या दरम्यान ही घटना घडलीय. घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.

दरम्यान, राहुल टिळेकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी  हल्ला केला. हल्ला केल्यावर तिथून ते पसार झाले असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला? फरार हल्लेखार कोण आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *