पुरंदर मध्ये “या” ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुरंदर मध्ये “या” ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका अल्पवयीन मुलीला आंघोळ करत असताना तिच्या बाथरूम मध्ये डोकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडितेने सासवड पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम ३५४ क बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील सासवड येथील साठे नगर येथे राहणाऱ्या आरोपी मच्छिंद्र मोहन कसबे याने फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या वीट बांधकाम असलेल्या व छत नसलेल्या बाथरुम मध्ये अंघोळ करत होती. यावेळी आरोपीने मुद्दाम जाणून-बुजून ती अंघोळ करत असताना बाथरूम मध्ये डोकावून पाहिले. पीडितेच्या हि गोष्ट लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला.

या नंतर तिचा भाऊ त्या ठिकाणी आला. त्याने आरोपीचा पाठलाग केला परंतु आरोपी पळून गेला. यानंतर याबाबतची माहिती पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितली दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडली होती.

यानंतर आज दिनांक ४नोव्हेंबर २०२१रोजी याबाबतची फिर्याद पीडितेने सासवड पोलिसात दिली आहे. सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *